पुन्हा धनंजय मुंडेंकडून पंकजा पराभूत

Header Banner

पुन्हा धनंजय मुंडेंकडून पंकजा पराभूत

  Mon May 15, 2017 16:49        Marathi

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा धनजंय मुंडेंनी बाजी मारली असून, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का दिला आहे. या निवडणुकीत दोन्ही बहिण-भावाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागा जिंकल्या तर, भाजपाला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले.  

या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे. या निवडणुकीच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या राजकारणावरील आपली पकड दाखवून दिली आहे.  

नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आता बाजार समितीमध्येही धनजंय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर मात केली आहे. आपणही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्याचे सूचित करणा-या पंकजांसाठी हा एक धक्का आहे. या निवडणुकीत एकूण 96 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन ही निवडणूक लढवली होती. 


   leadership,politics of the district ,Nationalist Congress Party