मुंबईकरांनी घेतला झिरो शॅडो डेचा अनुभव

Header Banner

मुंबईकरांनी घेतला झिरो शॅडो डेचा अनुभव

  Mon May 15, 2017 15:40        Environment, Marathi

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक होतायत, उन्हाळ्यातही पावसाच्या सरी बरसणे आणि गरमीचा अनुभव येणे सुरूच आहे. त्यातच आज सोमवारी माणसाच्या कायम सोबत असलेली सावलीही त्याच्यापासून काळी वेळासाठी लुप्त झाली होती. सूर्यबरोबर जेव्हा डोक्यावर आला होता तेव्हा म्हणजेच दुपारी 12 वाजून 34 मिनिटे ते 12 वाजून 26 मिनिटांदरम्यान अनेकांनी शून्य सावलीचा अनुभव घेतला आहे. मुंबईच्या नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी ही माहिती दिली आहे. 

मात्र वातावरणात सतत होणा-या बदलांमुळेच हे शक्य झालं आहे. वातावरणातील अनाकलनीय बदल हा दिवसेंदिवस विध्वंसाकडे घेऊन जातोय. ठरावीक काळानंतर पडणारा दुष्काळ, शहरासह देशभरातले वाढत जाणारे तापमान आणि मोठ्या प्रमाणातील प्रदूषणसुद्धा येऊ घातलेल्या विध्वंसकतेला तितकेच कारणीभूत आहे, अशी माहिती मुंबई वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. 

कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, हवामानाच्या भयंकर परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. आपणच सर्वत्र निसर्गाची हानी केली आहे. आपणच ग्लोबल वॉर्मिंग वाढवले आहे. मुंबईतली उष्णता वाढण्यामागेसुद्धा आपणच आहोत. आपण झाडे तोडली त्यात भर म्हणून सर्वांनी आपापली घरे वातानुकूलित केली आणि बाहेरचे तापमान वाढवले. म्हणून शहरासह देशभरातील उष्णता वाढली आहे. 2002, 2005, 2009, 2010 आणि 2016 ही आतापर्यंतची सर्वात उष्ण वर्षे होती. तर यंदाचा फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण होता.


   Mumbaikars,Zero Shadow Day,atmosphere, changes in the environment,Mumbai Observatory's