धक्कादायक, मुंबईत भररस्त्यात चुंबनासाठी महिलेवर जबरदस्ती

Header Banner

धक्कादायक, मुंबईत भररस्त्यात चुंबनासाठी महिलेवर जबरदस्ती

  Sat Mar 18, 2017 12:48        Marathi

रंगपंचमी खेळताना रंगलेल्या चेह-याचा फायदा घेऊन एका युवकाने भररस्त्यात महिलेचे जबरदस्तीने चुंबन घेतले. मुंबईतील माटुंगा येथील किंगसर्कल परिसरात मंगळवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. पीडित महिला 50 वर्षांची आहे. दुपारचे जेवण केल्यानंतर पीडित महिला पाय मोकळे करण्यासाठी म्हणून खाली उतरली.  

इमारतीच्या कंपाऊंडमध्ये महिला फे-या मारत असताना एका विशीतील युवक येऊन तिच्यासमोर उभा राहिला. त्याचा चेहरा आणि कपडे पूर्णपणे रंगाने माखलेले होते. त्याने या महिलेला पकडले व चुंबन घेण्याचा प्रयत्न केला पण महिलेने त्याला विरोध केला. तरीही, या युवकाने जबरदस्तीने चुंबन घेण्याच्या प्रयत्नात या महिलेचा चावा घेतला. ज्यामध्ये ही महिला जखमी झाली. महिला मदतीसाठी आरडाओरडा करत असताना तिने या युवकाल पकडून ठेवले होते पण आरोपीने पूर्ण ताकतीने महिलेला धक्का मारला व तिथून निसटला.  

पतीने आणि मुलाने जेव्हा या महिलेला पाहिले तेव्हा ती खाली कोसळलेली होती. तिच्या ओठातून रक्त येते होते. त्यांनी लगेच तिला हाकेच्या अंतरावर असलेल्या सायन रुग्णालयात नेले. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

lokmat


   Shocking, Mumbai bhararastyata,kisses the woman