कार रेसर अश्विन आणि त्याच्या पत्नीचा आगीमध्ये होरपळून मृत्यू

Header Banner

कार रेसर अश्विन आणि त्याच्या पत्नीचा आगीमध्ये होरपळून मृत्यू

  Sat Mar 18, 2017 12:38        Marathi

प्रसिद्ध कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीताचा शनिवारी पहाटे झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. चेन्नईच्या संतहोम हाय रोडवर हा भीषण अपघात घडला. अश्विनच्या बीएमडब्ल्यू कारने रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिल्यानंतर लगेच पेट घेतला 

अश्विन आणि निवेदीता दोघांना कारचे दरवाजे उघडता न आल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्यावेळी अश्विन गाडी चालवत होता. निवेदीता डॉक्टर होती ती एका खासगी रुग्णालयात नोकरीला होती. आगीच्या ज्वाळांनी वेढलेली गाडी पाहिल्यानंतर रस्त्यावरुन जाणा-या वाटसरुंनी लगेच चेन्नई पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अग्निशमन अधिका-यांनाच आगीवर नियंत्रण मिळवायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला. 

पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतदेह इतके खराब अवस्थेत होते की, पोलिसांना लगेच अश्विन सुंदरला ओळखता आले नाही.  गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरुन पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. पोरुर जवळच्या अल्पाक्कम येथे अश्विन आणि त्याची पत्नी राहत होते. एमआरसी नगर येथे राहणा-या मित्राच्या घरी ते गेले होते. तिथून परतत असताना ही दुर्देवी घटना घडली.

lokmat


   Ashwin car racer,his wife died,horapaluna