सीआयएसएफ जवानाचा अंदाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू

Header Banner

सीआयएसएफ जवानाचा अंदाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू

  Thu Jan 12, 2017 16:30        Marathi

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला(सीआयएसएफ)च्या जवानानं स्वतःच्या सहका-यांवरच गोळीबार केला आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा गोळीबारानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. हा गोळीबार बिहारमधल्या पाटणापासून जवळपास 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या औरंगाबाद येथे झाला आहे. 

रजा न मिळाल्यानं या सीआयएसएफच्या जवानानं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर घटनास्थळी पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ दाखल झाले आहेत. या जवानाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडील बंदूकही जप्त केली आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यप्रकाश यांनी दिली आहे.   Firing CISF jawan, infection