चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच करेल सुटका - सुभाष भामरे

Header Banner

चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच करेल सुटका - सुभाष भामरे

  Thu Jan 12, 2017 16:29        Marathi

नजर चुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच सुटका करेल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे.  

कसे पोहोचले चंदू चव्हाण पाकिस्तानात?

28 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळे उद्ध्वस्त केली. 

यानंतर काही वेळाने चंदू चव्हाण यांनी नकळत नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले, अशी माहिती समोर आली होती. यानंतर भारतीय सैनिक पकडल्याची माहितीही पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली होती. 

 


   Chandu Chavan,will soon rid Pakistan