मिया बिवी राजी तो क्या करेगा काझी- मद्रास हायकोर्ट

Header Banner

मिया बिवी राजी तो क्या करेगा काझी- मद्रास हायकोर्ट

  Thu Jan 12, 2017 16:25        Marathi

मद्रास उच्च न्यायालयानं मुस्लिमांच्या तलाकवर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुस्लिमांच्या तलाकमध्ये काझींनी दिलेलं प्रमाणपत्र कायद्यानं वैध धरता येणार नाही, असं मद्रास उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे मिया बिवी राजी तो क्या करेगा काझी, याची आठवण करून दिली आहे.

मुख्य न्यायाधीश एस. के. कौल आणि न्यायाधीश एमएम सुंद्रेश यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. माजी आमदार बदर सैयद यांच्या जनहित याचिकेवर अंतरिम आदेश देताना न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. सैयद यांनी याचिकेत काझींनी दिलेल्या निर्णयाचा निषेध केला आहे. त्यांनी काझीनी दिलेलं ट्रिपल तलाक आणि अन्य इतर कागदपत्र ग्राह्य धरण्यास मंजुरीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. 

न्यायालयानं 1880 काझी अ‍ॅक्टवर ताशेरे ओढले असून, काझींचं पद व्यक्तीला न्यायिक आणि प्रशासनिक अधिकार मिळत नाही. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानंही काझींच्या अधिकारांना अवैध ठरवलं आहे. काझी फक्त शरिया कायद्यांतर्गत निर्णय देऊ शकत असल्याचं म्हटलं आहे. सैयद यांनी समर्थनार्थ त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ(शरिया) अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅक्ट 1937चा हवाला दिला आहे. कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.


   Miya Biwi willing, kajhi Madras High court