सेना-भाजपाचे एकमत, उद्धव ठाकरेंचा नवा फॉर्म्युला

Header Banner

सेना-भाजपाचे एकमत, उद्धव ठाकरेंचा नवा फॉर्म्युला

  Wed Jan 11, 2017 15:57        Marathi

शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांकडून युतीबाबत सकारत्मक चर्चा आणि विधाने आली आहेत. आज सकाळी भाजपा नेत्यांची मुख्यमंत्री निवसस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेला युतीबाबत निमंत्रण देण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांना बोलताना म्हणाले की, मी युतीबाबत कधी नकारात्मक नव्हतो, जागावाटपाबात माझ्याकडे एक नवा फॉर्म्युला आहे. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी ३-३ नेते जागा वाटपाची चर्चा करतील पण अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्रीच घेऊ.  

मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण जागावाटप झाल्यावरचं अंतिम चित्र समोर येईल. आजपासून युतीच्या जागावाटपासाठी चर्चा सुरु करणार असल्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले आहे.    Army-party consensus, novel Formula,Uddhav Thackeray ,