डोनाल्ड ट्रम्प यांची सेक्स टेप रशियाच्या हाती

Header Banner

डोनाल्ड ट्रम्प यांची सेक्स टेप रशियाच्या हाती

  Wed Jan 11, 2017 15:39        Marathi, World

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तरीही त्यांच्या अडचणी संपण्याची काही चिन्हे नाहीत. ट्रम्प यांची सेक्स टेप रशियाकडे असल्याची माहिती अमेरिकेतील माध्यमांनी दिली आहे. तसेच अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांनीही ट्रम्प यांना याची कल्पना दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ट्रम्प यांनी माझ्या बदनामीसाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान, 2013ला मास्कोमधल्या एका हॉटेलमध्ये ट्रम्प यांनी कॉलगर्ल्ससोबत केलेल्या सेक्सचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ट्रम्प यांना ब्लकमेल करून रशियानं अनेक करार करून घेतल्याचीही माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे, असं वृत्त सीएनएननी दिलं आहे.

तत्पूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना जिंकवण्यासाठी रशियन हॅकर्सनी डेमोक्रॅटिक पक्ष आणि हिलरी क्लिंटन यांच्या संगणकातील महत्त्वाची माहिती हॅक केल्याचंही समोर आले होते. तसेच ट्रम्प यांचे प्रतिनिधी आणि रशियन सरकारच्या प्रतिनिधींमध्येही मोठ्या प्रमाणात माहितीची देवाण-घेवाण होत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ट्रम्प रशियालाही समर्थन देत असल्याचं उघड झालं आहे.


   Donald Trump,sex tape in the hands,Russia