बंगळुरुत पुन्हा विनयभंग, आरोपीने घेतला तरुणीचा चावा

Header Banner

बंगळुरुत पुन्हा विनयभंग, आरोपीने घेतला तरुणीचा चावा

  Sat Jan 07, 2017 15:25        Marathi

शहरात एका 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. नागवरा मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. ही तरुणी अरेबिक कॉलेज बसस्टॉपच्या दिशेने जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने तिचा चावाही घेतला. तरुणीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने पळ काढला.  

नववर्षाच्या पुर्वसंध्येला तरुणी आणि महिलांचा विनयभंग झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. दुसरीकडे एक जानेवारी रोजी तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर 24 तासात ही घटना घडली आहे.  

पीडित तरुणी एका खासगी कंपनीत कामाला आहे. कामावर जात असताना तिला या धक्कादायक घटनेला सामोरं जावं लागलं.

आरोपी तिच्यावर लक्ष ठेवून होता, आणि हल्ला केला तेव्हा तिचा पाठलाग करत होता अशी माहिती मिळाली आहे. ही तरुणी शिवाजीनगरची रहिवासी आहे. तिची आई शहराबाहेर गेली असल्याने एकट्या मुलीच्या सुरक्षेची चिंता म्हणून नातेवाईकांकडे राहत होती.  

पीडित तरुणीला काही जखमा झाल्या आहेत. आरोपीशी झटापट करताना जिभही थोडी कापली गेली आहे. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. 


   Bangalore molested again, the accused took,young woman