धोनीच्या राजीनाम्यावर काय म्हटले वीरुने

Header Banner

धोनीच्या राजीनाम्यावर काय म्हटले वीरुने

  Sat Jan 07, 2017 15:08        Marathi, Sports

महेंद्रसिंह धोनीच्या वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. धोनीच्या हितचिंतकांनी कर्णधारपदाच्या यशस्वी कारकीर्दीसाठी धोनीला शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकर ते विराट कोहली सर्वांनी धोनीचे कौतुक केले. या यादीत एकनाव गायब होते ते म्हणजे विरेंद्र सेहवाग.  

धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना सेहवाग आणि धोनीमध्ये काही मुद्यांवरुन मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे एरवी टि्वटरवर सक्रिय असणार सेहवाग धोनीच्या कर्णधारपद सोडण्यावर काही बोलणार नाही असे अनेकांना वाटले होते. 

 पण असे नाहीय. मुल्तानच्या सुल्तानने अखेर आज 7 जानेवारीला धोनीने राजीनामा दिल्यानंतर तीन दिवसांनी त्याला शुभेच्छा दिल्या. धोनीला शुभेच्छा द्यायला इतके दिवस का लावले त्याचे कारणही सेहवागने सांगितले. धोनीने 4 जानेवारीला कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मला वाटले होते त्यापेक्षाआधी  धोनीने हा निर्णय घेतला. 7 हा धोनीचा आवडता नंबर आहे त्यामुळे मी त्याला आज शुभेच्छा देतोय असे सेहवागने क्रिकेट टॉकीजमध्ये लिहीले आहे.   

धोनी उत्तम कर्णधारचं नव्हे तर तो एक मोठया मनाचा माणूस आहे. एक खेळाडू, कर्णधार म्हणून धोनीचे मैदानावरील कौशल्य सर्वांना माहिती आहे. पण त्यापेक्षाही तो मोठया मनाचा चांगला माणूस आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो असे सेहवागने क्रिकेट टॉकीजमध्ये लिहीले आहे. धोनीने कर्णधारपदाची वस्त्र खाली ठेवली असली तरी, तो यष्टीरक्षक, फलंदाज म्हणून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघात खेळणार आहे.


   Dhoni ,resignation,indian cricket